THE MISSION NEWS 24

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्र , अकोला : भ्रष्टाचाराच्या साखळीतील मोठा मासा गळाला ! सहाय्यक अधीक्षक ढेंगे निलंबित, पडद्यामागची 'ती' महिला अधिकारी कोण ? अकोल्यात भ्रष्टाचाराचा भूकंप ! बड्या महिला अधिकाऱ्याचा बुरखा फाटणार ? भ्रष्टाचाराचा भूकंप ! स्त्री रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक ढेंगे निलंबित, वरिष्ठ महिला अधिकारीही अडकण्याची शक्यता !

भ्रष्टाचाराच्या साखळीतील मोठा मासा गळाला ! सहाय्यक अधीक्षक ढेंगे निलंबित, पडद्यामागची 'ती' महिला अधिकारी कोण ?

भ्रष्टाचाराचा भूकंप ! स्त्री रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक ढेंगे निलंबित, वरिष्ठ महिला अधिकारीही अडकण्याची शक्यता !

अकोल्यात भ्रष्टाचाराचा भूकंप ! बड्या महिला अधिकाऱ्याचा बुरखा फाटणार ?

निलंबनाने उघडले भ्रष्टाचाराचे दार, आता मोठे ‘मगरमच्छ’ गळाला लागणार !

महाराष्ट्र,अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहारांच्या मालिकेनंतर प्रशासनाने अखेर निर्णायक पाऊल उचलले आहे. शासनाच्या निधीचा अपहार आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सहाय्यक अधीक्षक पी.बी. ढेंगे याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य सेवा उपसंचालक, अकोला यांच्याकडून १५ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशाने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. हा निलंबनाचा निर्णय म्हणजे भ्रष्टाचाराच्या साखळीला बसलेला एक मोठा धक्का असून, यामुळे या साखळीतील वरिष्ठ अधिकारीही कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​ढेंगे याच्या निलंबनाचे कारण : शासनाच्या पैशाचा अपहार आणि कर्तव्यदोष

ढेंगे याच्या निलंबनासाठी दिलेला आदेश त्याच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांचा आरसा आहे. या आदेशानुसार, ३० सप्टेंबर २०२० ते ३० जून २०२४ या कालावधीत ढेंगे याच्याकडे जमा असलेली शासनाची ४,५१,५५९/- रुपयांची रक्कम त्याने विहित मुदतीत, म्हणजेच ३ ते ७ दिवसांच्या आत, शासनाच्या खात्यात जमा केली नाही. हा निधी तब्बल ८ ते १० महिने विलंबाने भरला गेल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

​याव्यतिरिक्त, त्याने रोखपालकडून मिळालेल्या १,६०,०००/- रुपयांच्या अग्रिम रकमेपैकी २९,०००/- रुपयांचा हिशोब त्यानी अद्याप दिलेला नाही. त्यामुळे, त्यानी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा गंभीर भंग केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पडद्यामागील षडयंत्र: गैरव्यवहारांचा उलगडा आणि 'ती' महिला अधिकारी

​ढेंगे याच्या गैरवर्तनाची यादी केवळ निधीच्या अपहारापुरती मर्यादित नाही. चौकशी समितीच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, जे त्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. यात रुग्णालयातील विविध कामांसाठी केलेली नियमबाह्य खरेदी, टीडीएसचा गैरवापर, निधीचा हिशोब न ठेवणे आणि भंगार विक्रीसारखे गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत.

या सर्व गैरव्यवहारांची चौकशी सुरू असतानाच, ढेंगे याला वाचवण्यासाठी आरोग्य विभागातीलच एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने पडद्यामागे सूत्रे हलविल्याची माहिती समोर आली आहे. ही अधिकारी ढेंगे याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. यामागे एक मोठे कारण होते. ढेंगे यानी या महिला अधिकाऱ्यासोबत अनेक भ्रष्टाचारी कृत्यांमध्ये सोबत काम केले आहे आणि त्यांची अनेक 'भ्रष्टाचाराची गुपिते' ढेंगे याला माहिती आहेत. ढेंगेवर कारवाई झाल्यास आणि त्याने तोंड उघडल्यास स्वतःचे पितळ उघडे पडेल, या भीतीने ती महिला अधिकारी ढेंगे याला पाठीशी घालत होती.

राजकीय पकड आणि दबावतंत्र

​या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेली ती वरिष्ठ महिला अधिकारी केवळ प्रशासकीय पदावरच नाही, तर तिचे राजकीय वर्तुळातही चांगले संबंध आहेत. ती अनेक राजकीय नेत्यांशी आणि स्थानिक पुढऱ्यांशी जवळून जोडली गेलेली आहे, ज्यामुळे तिचा प्रभाव केवळ आरोग्य विभागापुरता मर्यादित नाही. याच राजकीय पकडीचा वापर करून ती लहान-मोठ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणते.

राजकीय पकड आणि दबावतंत्र

​जेव्हा एखादे काम नियमांनुसार होत नाही किंवा तिच्या गैरव्यवहारांवर प्रश्नचिन्ह उभे राहते, तेव्हा ती थेट राजकीय वजनाचा वापर करते. चौकशी समित्या आणि प्रशासकीय कार्यवाहीवर प्रभाव टाकण्यासाठी ती राजकीय हस्तक्षेपाचा उपयोग करते. त्यामुळे, अनेक अधिकारी तिच्याविरोधात कारवाई करण्यास कचरतात. तिच्या याच प्रभावामुळे ढेंगेसारख्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारात साथ देण्यासाठी प्रोत्साहन मिळत होते. या महिलेला पूर्ण खात्री होती की, तिच्या राजकीय संरक्षणामुळे त्यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई होणार नाही. ढेंगेचे निलंबन हा तिच्यासाठी एक धक्का आहे, कारण यामुळे तिची राजकीय पकड आणि भ्रष्टाचाराची गुपिते उघडकीस येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आता चौकशीची दिशा बदलणार ?

प्रशासनाने  ढेंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून योग्य पाऊल उचलले असले तरी, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसत आहे. केवळ ढेंगे याच्यावर कारवाई करून चालणार नाही. या भ्रष्टाचाराच्या साखळीतील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. ज्या महिला अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ढेंगे याने गैरव्यवहार केले, त्यांचीही चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, ढेंगेसारखे लहान मासे अडकतील, पण मोठे मगरमच्छ मात्र मोकाट राहतील.

​या निलंबनानंतर आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा निलंबनाचा आदेश म्हणजे या भ्रष्ट साखळीवर केलेला एक गंभीर हल्ला असून, येणाऱ्या काळात अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. आता प्रशासनाचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निलंबनाचा आदेश: महाराष्ट्र शासनाचा गंभीर निर्णय

​उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला

जा.क्र. उपसंआसे/आस्था ६/श्री ढेंगे/निलंबीत /दिनांक:- १५/०९/२०२५

​आदेशाचे कारण आणि तपशील:

गैरव्यवहार: श्री. पी. बी. ढेंगे यांनी ३०.०९.२०२० ते ३०.०६.२०२४ या काळात त्यांच्याकडे असलेल्या ४,५१,५५९/- रुपयांच्या शासकीय रकमेची भरणा वेळेत केली नाही. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार, ही रक्कम ३ ते ७ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक होते, परंतु ती ८ ते १० महिन्यांच्या विलंबाने भरण्यात आली.

अपूर्ण हिशोब: रोखपाल यांच्याकडून मिळालेल्या १,६०,०००/- रुपयांच्या अग्रिम रकमेपैकी, २९,०००/- रुपयांचा हिशोब ढेंगे यांनी अद्याप दिलेला नाही.

वर्तणूक नियमांचा भंग: वरील दोन्ही कृतींमुळे ढेंगे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ नुसार सचोटी, कर्तव्यपरायणता आणि सार्वजनिक हिताचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे.

निलंबनाचा निर्णय: महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील भाग २, नियम ४, पोटनियम १-अ नुसार, श्री. पी. बी. ढेंगे, सहाय्यक अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.

​निलंबनाच्या अटी:

​मुख्यालय: निलंबन काळात ढेंगे यांचे मुख्यालय ग्रामिण रुग्णालय, लोही, जिल्हा यवतमाळ येथे असेल. सक्षम प्राधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

​निर्वाह भत्ता: निलंबन आदेश लागू असेपर्यंत, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्विवेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ च्या नियम ६८ नुसार ढेंगे यांना निर्वाह भत्ता आणि इतर पूरक भत्ते दिले जातील.

इतर अटी: निलंबन काळात त्यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही.

​या आदेशाची एक प्रत वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला आणि दुसरी प्रत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामिण रुग्णालय, लोही यांना पाठवण्यात आली आहे, जेणेकरून पुढील कार्यवाही करता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post