THE MISSION NEWS 24

महाराष्ट्र , अकोला : सिव्हिल सर्जन कार्यालयात हिटलरशाही ! एका दिवसाच्या ‘सीएस’ने कर्मचाऱ्यांचे केले मानसिक शोषण; डॉक्टर,आरती कुलवाल यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास ! अकोल्याच्या सिव्हिल सर्जन कार्यालयात अजब-गजब प्रकार: 'नायक' नव्हे, 'खलनायक' ठरलेला सीएस !

सिव्हिल सर्जन कार्यालयात हिटलरशाही ! एका दिवसाच्या ‘सीएस’ने कर्मचाऱ्यांचे केले मानसिक शोषण; डॉक्टर,आरती कुलवाल यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास!

अकोल्यात ‘हिटलरशाही’चा एकदिवसीय प्रयोग; 'मावळत्या सूर्या'ला कर्मचाऱ्यांनी दिला 'जोरदार टाटा-बायबाय'!

सिव्हिल सर्जन कार्यालयात ‘हिटलरशाही’चा एकदिवसीय प्रयोग ! एका दिवसाच्या ‘सीएस’चे ‘अंधेरे मे’ झाले ‘सफर’

महाराष्ट्र,अकोला : अकोला जिल्ह्यातील तीन वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे आरोग्य विभागात शोककळा पसरली होती, परंतु याच शोककळेचा फायदा घेत डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांनी एका दिवसाच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. अनिल कपूरच्या चित्रपटातील नायक एका दिवसात जनतेची सेवा करतो, सकारात्मक बदल घडवतो, पण डॉ. देशमुख यांची भूमिका याच्या अगदी विरुद्ध होती. त्यांना मिळालेली खुर्ची त्यांच्या डोक्यात अशी काही शिरली की, त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अमानवी नियम लावले.

अकोल्याच्या सिव्हिल सर्जन कार्यालयात १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत . चार दिन की चांदनी, फिर काली रात है’ या म्हणीचा प्रत्यय अकोल्याच्या सिव्हिल सर्जनकार्यालयाला नुकताच आला. ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या निलंबनामुळे रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अवघ्या एका दिवसासाठी. डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांनी 'खुर्ची'च्या मोहात अक्षरशः हिटलरशाहीचा नमुना सादर केला. मात्र, 'अंधेरी रात' लवकरच संपली आणि ४ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ.आरती कुलवाल यांच्या रूपाने 'उगवत्या सूर्या'चे आगमन झाले. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांनी 'अंधेरी रात' संपल्याचा आनंदोत्सव साजरा करत, 'मावळत्या सूर्या'ला जोरदार टाटा-बायबाय दिला.

'एक दिवसाचा सीएस' आणि 'खुर्ची'ची नशा

 ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ या अनिल कपूरच्या गाजलेल्या चित्रपटाची आठवण करून देणारा पण त्याच्या नेमका उलट अनुभव अकोल्याच्या सिव्हिल सर्जन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेतला.

अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटात मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसून एका दिवसात जनतेची सेवा करणाऱ्या नायकासारखे काहीतरी घडेल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. पण येथे तर 'सेवा' हा उद्देश पूर्णतः विसरून केवळ 'खुर्ची'च्या मोहात अंध झालेल्या डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख. यांनी एका दिवसातच कार्यालयाचे वातावरण विषारी करून टाकले. दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, यांचे पत्र क्र. २८८१३-१९/२५ नुसार त्यांना तात्पुरता कार्यभार मिळाला होता. पण या पत्राची शाई सुकण्यापूर्वीच त्यांच्या डोक्यात सत्तेचा असा काही माज शिरला की, त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कठोर आणि अमानवी नियमावली लागू केली.

‘मीच आता सीएस आहे. माझ्या हुकुमाशिवाय कोणीही काहीही करायचे नाही,’ असे फर्मान त्यांनी जारी केले. याहून कहर म्हणजे, 'मला विचारल्याशिवाय कोणाशी बोलायचं नाही, कोणाला उभं करायचं नाही', असेही त्यांनी स्पष्ट बजावले. चहा पिण्यासाठी किंवा नैसर्गिक विधीसाठी (लघवीला) जाण्याची सुद्धा परवानगी नाकारण्यात आली. ‘जो कोणी कामावरून उठून लघवीला किंवा चहासाठी गेला, त्याला मी कामावरून टर्मिनेट करीन,’ अशा धमक्या त्यांनी दिल्या. त्यांच्या या वागण्यामुळे कार्यालयात भयाण शांतता आणि भीतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे, त्यांच्या मर्जीतील नम्रान नावाचा कर्मचारी नमाजसाठी दोन-तीन तास सुट्टी घेऊ शकतो, पण इतरांना साधी लघवीचीही परवानगी नव्हती. हा निव्वळ पक्षपात आणि जाती-धर्माचे राजकारण असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. विशेष म्हणजे, डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांच्या मर्जीतील काही चापलूस कर्मचारी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ‘आपणच दुसरे सीएस’ असल्याच्या थाटात वावरत होते, ज्यामुळे कार्यालयातील गोंधळात भर पडली.

'मावळत्या सूर्या'चा फजितवाडा 

देवाच्या मनात दुसरेच

 म्हणतात ना 'देवाची करणी, नारळात पाणी'.डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांच्या 'एक दिवसाच्या सीएस' पदावर अवघ्या काही तासांतच पडदा पडला. उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळाने, डॉ. तरंगतुषार वारे यांच्या निलंबनानंतर डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांना देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार रद्द करत, तात्काळ सुधारीत आदेश काढले. डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांची ही हुकूमशाही लवकरच संपुष्टात आली. दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सुधारीत आदेश क्र. २९१९६-२०२/२५ नुसार त्यांना देण्यात आलेला कार्यभार रद्द करण्यात आला. त्यांच्या जागी डॉ. आरती कुलवाल यांच्याकडे सिव्हिल सर्जन पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

ही बातमी कार्यालयात पसरताच कर्मचाऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. 'मावळत्या सूर्या'च्या हिटलरशाहीचा अध्याय संपल्याचा आनंदोत्सव साजरा करत काही कर्मचाऱ्यांनी त्यांची जोरदार टिंगल-टवाळी केली. 'बघ, किती मोठे सीएस बनले होते,' (इमरान के आका) असे म्हणत एकमेकांना चिडवले. खुर्चीच्या मोहात अंध झालेल्या डॉ. मोहम्मद सऊदमिया अब्दुल गफुरमिया देशमुख यांचा असा 'फजितवाडा' पाहून सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

'उगवत्या सूर्या'चे अभिनंदन

डॉ. आरती कुलवाल यांनी पदभार स्वीकारताच कार्यालयात एक सकारात्मक ऊर्जा संचारली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि सौम्य स्वभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कामाचे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. 'मावळत्या सूर्या'चा अध्याय संपुष्टात आल्यामुळे आणि 'उगवत्या सूर्या'चे आगमन झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल सर्जन कार्यालयाचा कारभार पुन्हा सुरळीत होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

'द मिशन न्यूज २४' चा इशारा: गैरकृत्यांचा पर्दाफाश करणार!

या घटनेची द मिशन न्यूज २४ ने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी डॉ. मोहम्मद सौदामिया अब्दुल गफुरमिया देशमुख याच्या इतर कार्यकाळातील आणि सेवा कालावधीतील गैरकृत्ये आणि काळ्या धंद्यांचा लवकरच पर्दाफाश करण्यात येईल. तसेच, एनएचएम कर्मचारी इम्रान याच्याबद्दल द मिशन न्यूज २४ कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींवरून सेवा संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, याचाही पाठपुरावा करून सत्य बाहेर आणले जाईल. द मिशन न्यूज २४ नुसती बातमी देऊन शांत बसणार नाही, तर या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचून कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करेल. कारण, समाजात कोणत्याही प्रकारचा जातीवाद आणि धार्मिक पक्षपात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा द मिशन न्यूज २४ संबंधितांना देत आहे. ही घटना प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. ‘जनसेवा’ हे ब्रीदवाक्य विसरून 'खुर्ची'च्या मोहात पडणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात असा 'अशी हुकूमशाही, मनमानी, जातियवादी 'कारभार पुन्हा कोणी करणार नाही.

सिव्हिल सर्जन कार्यालयात अजब-गजब प्रकार: एक दिवसाच्या 'हिटलर'ला कर्मचाऱ्यांनी दिला 'जोरदार टाटा-बायबाय 


अकोल्याच्या सिव्हिल सर्जन कार्यालयात अजब-गजब प्रकार: 'नायक' नव्हे, 'खलनायक' ठरलेला सीएस !

नम्रान आणि 'सीएस'चा जातिवाद: सिव्हिल सर्जन कार्यालयात धार्मिक पक्षपात आणि हिटलरशाहीचा आरोप.


'द मिशन न्यूज 24' चा 'एक दिवसाच्या सीएस'ला इशारा: गैरकृत्यांचा पर्दाफाश करणार, कठोर कारवाई होईपर्यंत थांबणार नाही !





Post a Comment

Previous Post Next Post