सानवी सोनवणे हिने राष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भुसावळ शहराचा नावलौकिक वाढवला आहे. तिने या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आणि रोलर रिले स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ४३ व्या ऑल इंडिया रोलर रिले चॅम्पियनशिपमध्ये तिने हे यश मिळवले.
सानवी केवळ खेळातच नव्हे, तर अभ्यासातही अव्वल आहे. ती पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून दरवर्षी शाळेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांक पटकावते. यासोबतच तिला कराटे, ॲबॅकस आणि चित्रकला यांसारख्या विविध कलांमध्येही प्रावीण
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देखील सानवीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकून देशाचे नाव रोशन केले होते. तिच्या या कामगिरीची दखल घेत राज्याचे क्रीडा मंत्री श्री दत्तात्रेय भरणे यांनी तिचे कौतुक केले होते.
दिनांक 3/5/2025


