(महाराष्ट्र, अकोला) आरोपींविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार, गुन्हा दाखल होऊनही शेअर बाजाराच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना फसवणाऱ्या आरोपींना अटक करण्यास अकोला, खदान पोलिसांची टाळाटाळ !
![]() |
(महाराष्ट्र, अकोला) एखाद्या गुन्हेगाराच्या, आरोपीच्या,बाबतीत बोटचेपी भूमिका घेण्याची अकोला, खदान पोलिसांची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकवेळा असं घडलंय की गुन्हा नोंद होऊन सुद्धा खदान पोलिसांना गुन्हेगार,आरोपी सापडत नाहीत. मात्र यामुळे अकोला,खदान पोलिसांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ? निर्माण झालं आहे.
(महाराष्ट्र, अकोला) जर कोणी तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून तुमचा नफा दुप्पट करण्याचा सल्ला देत असेल, तर त्याची सखोल चौकशी करा कारण काही कपटी, धोकेबाज,भोंदू तुम्हाला गोड बोलून आर्थिक फसवणूक करून त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात.असाच एक प्रकार अलिकडेच महाराष्ट्रातील,अकोला येथील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून समोर आला आहे. शेअर बाजाराच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या > आरोपी : > इकराम चौहान, रोहित रंगवानी,जयेश जितवानी या आरोपींविरुद्ध,सदरहू प्रकरणा संबंधित दिनांक २९/०७/२०२४ रोजी खदान पोलीस ठाण्यात,पोलीस निरीक्षक,खदान अकोला यांच्याकडे गुन्हा नोंद करण्याकरिता लेखी स्वरुपात तक्रार दाखल करण्यात आली होती.सदरहू प्रकरणामध्ये, बहुचर्चित नागरिकांमध्ये,अनेक उर्फ नावाने ओळखला जाणारा कुख्यात लाचखोर पोलीस बक्कल नंबर १२६ विजय सुखदेवराव चव्हाण व पोलीस हवालदार नितीन मगर या दोघांची पोलीस चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली त्यानंतर कलम ४२०, ४०६, ३४ भांदवी नुसार दखलपात्र गुन्हा नोंदविणे अनिवार्य होता. तक्रारकर्ते यांच्या म्हणण्यानुसार तसे न करता खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे ,यांच्या खास मर्जीतले चौकशी तथा तपास अधिकारी पोलीस हवालदार विजय सुखदेवराव चव्हाण व संबंधित सहकर्मी यांना तक्रारकर्ते यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक विनवण्या करून सुद्धा सारख्या चार महिने पोलीस ठाण्यात चकरा मारण्यास भाग पाडले, खदान,पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी विजय सुखदेवराव चव्हाण त्याचा सहकर्मी यांच्याकडून तक्रारकर्ते यांना दिशाभूल केल्या जात असून गैरअर्जदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करून, उडवा उडवी ची उत्तरे देऊन, नाहक त्रास दिल्या जात आहे याची जाणीव होताच तक्रारकर्ते यांनी अकोला येथील माननीय न्यायालयात धाव घेतली. जिथे (न्यायिक दंडाधिकारी एस.जे.बोंद्रे) दिनांक : २९/११/२०२४ न्यायालयाच्या आदेशानुसार, शेअर बाजाराच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना फसवणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्रातील,अकोला येथील खदान पोलीस ठाण्यात दिनांक ०२.१२.२०२४ रोजी अप.क्र.९१४/२०२४ कलम ४२०, ४०६,३४ भांदवी नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मालिकेत शेकडो नागरिकांचा समावेश असलेल्याने, कोट्यावधी रुपयांची फसवणूक आणि बनावटगिरी झाल्याची शक्यता आहे. तक्रारदारासह सहा जण, खदान परिसरातील जेतवन नगर येथील रहिवासी, २८ वर्षीय मोहम्मद सोहेल शेख करीम यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार ३१ वर्षीय इकराम चौहान, काला चबुतरा येथील रहिवासी, इंदौर रेडीमेड चा मालक ,पक्की खोली सिंधी कॅम्प येथील रहिवासी रोहित रंगवानी आणि निमवाडी, खदान येथील रहिवासी जयेश जितवानी यांच्या संपर्कात आले होते, ज्यामध्ये आरोपींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी या लोकांना विश्वासात घेऊन खोटे बोलल्याचा आरोप आहे.या लोकांची दिशाभूल करून त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले गेले. शेअर बाजारात नफा न झाल्यास ६० दिवसांच्या आत गुंतवणुकीची रक्कम परत करण्याचे आश्वासनही आरोपीने दिले.सर्व तक्रारदार शेअर बाजाराच्या बाबतीत अशिक्षित असल्याने,याच बाबतीचा गैरफायदा घेऊन आरोपीने तक्रारदारांना विश्वासात घेऊन अशाप्रकारे, तक्रारदारांनंकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात लाखो रुपये घेतल्याचा दावा तक्रारदार यांनी केला आहे. काही काळानंतर, जेव्हा तक्रारदारांकडून नफ्याची रक्कम मागण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा तिन्ही आरोपींनी टाळाटाळ करण्याचे डावपेच वापरले. यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे समजून,जाणून फिर्यादींनी प्रथम खदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. तसेच, तक्रारदाराने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात या संदर्भात तक्रार दाखल केली.अखेर न्यायालयाच्या आदेशावरून आरोपी इकराम चौहान, जय जितवानी आणि रोहित रंगवानी यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित फिर्यादी: कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी (contempt of court) लवकरच याचिका दाखल करणार आहेत.
तक्रारकर्ते यांच्या म्हणण्यानुसार कलम ४२०, ४०६,३४ भांदवी नुसार दखलपात्र गुन्हा असून सुद्धा तक्रारकर्ते यांनी आरोपींविरुद्ध,सदरहू प्रकरणा संबंधित दिनांक २९/०७/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक,खदान अकोला यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर माननीय भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार कोणत्याही प्राथमिक चौकशी शिवाय दखलपात्र गुन्ह्यांमध्ये एफ.आय.आर.नोंदविणे बंधनकारक असून सुद्धा संबंधित पोलीस अधिकारी यांनी गैरअर्जदार यांच्यावर गुन्हा न नोंदविल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणून तक्रारकर्ते अकोला खदान,पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे खदान, पोलीस हवालदार विजय सुखदेवराव चव्हाण, संबंधित पोलीस तपास अधिकारी यांच्याविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी (contempt of court) लवकरच याचिका दाखल करणार आहेत. संबंधित तक्रारकर्ते यांनी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जर याचिका दाखल केली तर वाळू प्रकरणात लाच मागितलेल्या बक्कल नंबर 126 विजय सुखदेवराव चव्हाण याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.बक्कल नंबर 126 विजय सुखदेवराव चव्हाण याच्याकडे अनेक दिवसांपासून अनेक तपास प्रलंबित आहेत ते तपास हेतूपुस्सर, साठ गाठ करण्याच्या उद्देशाने प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. भविष्यात प्रलंबित तपासातील,अनेक पीडित तक्रारकर्ते समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे सुद्धा पोलीस हवालदार बक्कल नंबर 126 विजय सुखदेवराव चव्हाण व खदान, पोलीस निरीक्षक मनोज केदारे तसेच संबंधित तपास अधिकारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गुन्हा नोंदविणे अनिवार्य असल्यानंतरही तसे न करता खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, त्यांच्या खास मर्जीतले चौकशी तथा तपास अधिकारी पोलीस हवालदार विजय सुखदेवराव चव्हाण व संबंधित सहकर्मी यांनी संबंधित तक्रारकर्ते यांना सारख्या चार महिने पोलीस ठाण्यात चकरा मारण्यास भाग पाडले, त्यांची दिशाभूल केली, त्यांना नाहक त्रास दिला, अनेक उडवा उडवीची उत्तरे दिली, गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. अखेर शेवटी त्यांना न्यायालयात जाण्यास भाग पाडले. माननीय न्यायालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम १७५(३) अंतर्गत तक्रारकर्ते यांचा दिनांक: २९/११/२०२४ ला अर्ज मंजूर करण्यात आला आहे व माननीय न्यायालयाने आदेश दिला आहे की...खदान पोलीस ठाण्याचे , अकोलाचे प्रभारी अधिकारी यांना आयपीसीच्या कलम ४०६, ४२० आणि कलम ३४ अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यांसाठी कलम १ ते ३ विरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत प्रभारी अधिकाऱ्याला पैसे वसूल करणे आणि इतर संबंधित पुरावे यासह व्यापक तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदर प्रकरण शेअर बाजार घोटाळयाचे असून यामध्ये विदेशी गुंतवणूक कायदयाचे सुध्दा उल्लंघन झालेले आहे. या प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल होऊन सुद्धा मोकाट का फिरत आहेत ? आतापर्यंत त्यांना अटक का करण्यात आली नाही ? माननीय न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा आरोपी यांच्या बँक अकाउंट चे उतारे काढून त्यांचे बँक अकाउंट सीज का केले गेले नाही ? तक्रारदार यांनी असे अनेक प्रश्न उपस्थित करून खदान पोलिस ठाण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ? निर्माण केले आहेत.या प्रकरणावर प्रकाशझोत टाकला असता असे लक्षात येते आहे की खदान पोलीस ठाणे आरोपींना पाठीशी घालत आहे, त्यांना अभय देत आहे. या प्रकरणांमध्ये आरोपी व पोलीस निरीक्षक खदान, पोलीस हवालदार विजय सुखदेवराव चव्हाण, संबंधित पोलीस तपास अधिकारी यांच्यामध्ये गैरव्यवहार,साठ गाठ, हात मिळवणी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही .या प्रकरणात चौकशी करून पोलीस निरीक्षक खदान, पोलीस हवालदार विजय सुखदेवराव चव्हाण, संबंधित पोलीस तपास अधिकारी व आरोपी यांची चौकशी करून ताबडतोब यांच्या साठ गाठीचे पितळ उघडे करण्यात यावे.व योग्य ती कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित तपास आर्थिक गुन्हें शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या कड़े वर्ग, करण्यात यावा अशा आशयाची तक्रार तक्रारकर्ते यांनी १५/१/२०२५ रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला तसेच दिनांक ६/०३/२०२५ रोजी पोलीस महानिरीक्षक,परिक्षेत्र अमरावती ता. जि.अमरावती यांना दिली आहे.
आरोपी: इकराम चौहान, रोहित रंगवानी,जयेश जितवानी यांचा शोध सुरु असल्याचं अकोला खदान पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र हा शोध घेण्यासाठी अकोला,खदान पोलिसांचे तपास पथक अजूनपर्यंत ना आरोपींच्या,गुन्हेगारांच्या घरी गेलंय, ना त्यांच्या दुकानांमध्ये, कार्यालयामध्ये खदान पोलिसांनी शोध घेतला. फक्त शोध सुरु आहे एवढंच पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे. अकोला, खदान पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण व्हावा,असं हे पहिलंच प्रकरण नाही.गेल्या काही काळात ज्या ज्या वेळी गुन्हेगार, आरोपींना अटक करण्याची वेळ आली, त्या त्या वेळी खदान पोलिसांनी कच खाल्ली आहे. तर अकोला जिल्हा न्यायालय यांनी शेअर बाजारच्या नावाखाली बेरोजगार युवकांना फसविणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध आदेश पारित केल्यानंतरही अकोला खदान पोलिसांना आरोपी, गुन्हेगार,सापडत नाहीत. फिर्याद नोंदवून तब्ब्ल नऊ महिने झाल्यानंतरही हे तीन आरोपी, गुन्हेगार अकोला, खदान पोलिसांना सापडले नाहीत. तक्रारदारासह सहा जणांनी, खदान परिसरातील जेतवन नगर येथील रहिवासी, २८ वर्षीय मोहम्मद सोहेल शेख करीम अधिक सहा जणांनी त्यांची ,फसवणूक केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढते आहे. कारवाई करतो आहोत हे दाखवण्यासाठी गुन्हा नोंद करायचा. मात्र त्यानंतर आरोपी, गुन्हेगार, सापडत नाही अस सांगत त्या गुन्हेगारांना,आरोपींना जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची संधी द्यायची, तिथे जामिन अर्ज फेटाळला तर त्या गुन्हेगार,आरोपींना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज करण्याची संधी द्यायची आणि दुसरीकडे प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचं दाखवून अटक करण्याची गरज नसल्याचं भासवायचं ही अकोला,खदान पोलिसांची काम करण्याची पद्धतच बनली आहे. या प्रकरणात तर तब्बल 9 महिने तीन आरोपी अकोला खदान पोलिसांना सापडले नाहीत. शेअर बाजाराच्या नावाखाली बेरोजगार युवकांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक केल्याचं हे प्रकरण गंभीर आहे. कारण यामध्ये अनेक गुंतवणूकदारांची आयुष्यभराची कमाई अडकली आहे. त्यामुळे खदान,पोलिसांनी या प्रकरणात कारवाईला सुरुवात करणं गरजेच आहे. मात्र अनेक महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही अकोला, खदान, पोलीस काहीच हालचाल करताना दिसत नसल्याने गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
या प्रकरणा संबंधात खदान पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन मगर यांच्याशी 📞भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता. त्यांच्याकडून माहिती मिळाली की पोलीस हवालदार विजय चव्हाण कडे असलेले सर्व प्रलंबित तपास काढून घेऊन नवीन तपास अधिकारी यांची नेमणूक करून त्यांच्याकडे देण्यात येणार आहेत व या संबंधित या प्रकरणात सुद्धा नवीन तपास अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. संपूर्ण तपास विजय चव्हाणच पाहत असल्यामुळे तपासा संदर्भात मला अधिक काही माहिती नाही.
‼️ दिनांक 8/04/2025‼️







