THE MISSION NEWS 24

महाराष्ट्र,अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा,सुरक्षेच्या नावाखाली दादागिरी,सीसीटीव्ही कॅमेरे बंद.


✒️ महाराष्ट्र, अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेच्या नावाखाली दादागिरी.

✒️ महाराष्ट्र, अकोला : शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षा यंत्रणेची दादागिरी: नागरिकांची चिंता वाढली.

✒️. महाराष्ट्र,अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा.

✒️ महाराष्ट्र,अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात सुरक्षा यंत्रणेची अनियमितता.✒️

‼️सुरक्षा यंत्रणेची दादागिरी‼️

रुग्णालयातील सुरक्षा रक्षक स्वतःची खासगी मालमत्ता मानून वागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसोबत अरेरावी करण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. अशा सुरक्षा रक्षकांवर नियंत्रण नसल्यामुळे हे प्रकार वाढत आहेत.

‼️सीसीटीव्ही कॅमेरे बंद‼️

रुग्णालयात 202 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, परंतु त्यापैकी 100 कॅमेरे बंद आहेत. या  कॅमेऱ्यांची  देखभाल व दुरुस्ती करण्यात येत नसल्याने हा खर्च व्यर्थ ठरला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी वर्षाला दीड ते दोन लाख रुपये खर्च होतो.

‼️नवजात मृतदेहाची घटना‼️

अकोला रुग्णालयाच्या पोलीस चौकीजवळ एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह कुत्र्यांनी छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची दादागिरी आणि निष्काळजीपणा यामुळे नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील जबाबदारांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

‼️सुरक्षेच्या नावाने दादागिरी‼️

रुग्णालय प्रशासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणेची आहे. मात्र, सुरक्षेच्या नावाखाली दादागिरी केली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. सामान्य व्यक्ती आधीच कोणाचा मृत्यू तर कोणी उपचार घेत असल्याने टेन्शनमध्ये, (तणावामध्ये) असतात. त्यामुळे ते अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करतात. सुरक्षारक्षक असोत की, त्यांच्यावर नियंत्रण असलेले जणू ही आपली खासगी मालमत्ताच आहे, या अविर्भावात वावरत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांसोबत, रुग्णांसोबत अरेरावी करण्याचे अनेक प्रकार नेहमीच घडत असतात.शिस्तीचे धडे देणाऱ्या अधिष्ठात्यांनी आधी सुरक्षारक्षकांनाच शिस्त लावावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 महाराष्ट्र, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा होत असल्याचं समोर आलं आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात खासगी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेत महाराष्ट्र सुरक्षा बल चे 56 सुरक्षा रक्षक तसेच मेस्कोचे 62 सुरक्षा रक्षक असे एकूण 120 सुरक्षारक्षक आहेत.  महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षा रक्षकांवर 18 लाख रुपये तर मेस्कोच्या सुरक्षा रक्षकांवर 20 लाख रुपये एकूण खर्च 28 लाख रुपये महिन्याला सुरक्षेवर खर्च होतो सीसीटीव्ही कॅमेराचा वर्षाला दीड ते दोन लाख रुपये देखभालीचा, मेंटेनन्स खर्च होतो. वर्षाला हा खर्च कोटी रुपयांच्या वर जातो. याआधी 2012 पासून स्थानिक तरुण सिक्युरिटी नावाची सुरक्षा फोर्स सुद्धा नेमण्यात आली होती जिचा खर्च महिन्याला तीन लाख रुपये होता जी आता बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णालच्या आवारात असलेली पोलीस चौकी,  इतकी सुरक्षा असूनही,इतका सगळा खर्च सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करूनही रुग्णालयामध्ये चोरीचे प्रमाण विशेषता मोटरसायकल गाड्यांच्या चोरीचे चे प्रमाण, स्वयंघोषित रुग्णांचा खुलेआम वावर, साठ गाठ करणाऱ्या दलालांचा वावर, रुग्णांचे फाशी घेण्याचे,आत्महत्या करण्याचे प्रकार, नवजात स्त्री जातीचे अर्भकाचे दिवसाढवळ्या खुलेआम कुत्र्यांनी लचके तोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला, प्रशासनाकडून एकूण 202 सीसीटीव्ही कॅमेरे कोणताही धोका होऊ नये म्हणून येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात आले होते. त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्याकडून पार पाडल्या जात आहे का ? असा यक्ष प्रश्नही उपस्थित होतो. रुग्णालय व महाविद्यालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील 100 सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णालयातील काही भागाचे बांधकाम चालू असल्यामुळे बंद अवस्थेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला, येथे शासनाचे 6 लाख रुपये खर्च करून 202 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील महत्त्वाच्या बारीक - सारीक हालचालींवर लक्ष, पहरा, निगराणी, ठेवणारे तिसरे डोळे बंद,पडलेले असून काही तिसऱ्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे.वर्षाला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीचा,व्यवस्थेचा (मेंटेनन्सचा) खर्च दीड ते दोन लाख रुपये असून सुद्धा हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद का ? असे असताना कॅमेऱ्यांची देखभाल व दुरुस्तीबाबत अनास्था दाखविली जात असून रुग्णालय व महाविद्यालयातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद पडल्यामुळे झालेला हा खर्च व्यर्थ झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहेत. बंद सीसीटीव्ही सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलीही ठोस पावले उचलली न गेल्याने दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? हा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे रुग्णालयातील सुरक्षेसाठी कोटींचा खर्च आणि कॅमेऱ्यांसह हायफाय सुरक्षा ठेवल्याचा दावा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी त्यांच्या ठिकाणाहून गायब असल्याचे आढळून आल्याने प्रत्यक्षात ग्राउंड रिपोर्ट काय आहे, हे स्पष्ट होते. द मिशन न्यूज 24 च्या पाहणीदरम्यान बहुतांश रक्षक त्यांच्या कर्तव्यावरून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर काही काळापूर्वी या रुग्णालयात अनेक नवजात गर्भही आढळून आले आहेत. असे असतानाही रुग्णालयातील भक्कम सुरक्षा व्यवस्थेमुळे नाममात्र लोकांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही या रुग्णालयात असे अनेक अपघात रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे झाले आहेत.

 विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातून अनेकवेळा नवजात भ्रूण बाहेर काढण्यात आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाची पोल खोल १० मार्च रोजी उघडकीस झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) महाराष्ट्रतील,अकोल्यामध्ये मानवतेला धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे.एका नवजात अर्भकाचा मृतदेह कुत्र्यांनी फाडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेह तासन्तास तसाच पडून राहिला, मात्र रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ राहिले. माणुसकीला लाजवेल अशी घटना सोमवारी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) परिसरात १० मार्च २०२५  रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंडके व एक हात नसलेले नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली.ज्याला कुत्र्यांनी छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेत हे अर्भक जीएमसीच्या पोलिस चौकीजवळ आढळल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.फेकलेल्या अवस्थेत नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला. डोके आणि पाय पूर्णपणे खाल्ले गेले. सुरक्षा रक्षक काय करत होते ? पोलीस चौकीतील पोलीस काय करत होते ? रुग्णालय प्रशासन काय करत होते ? कुठल्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हेे दृश्य टिपलेेेे नाही का ? महाविद्यालय (जीएमसी) परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंडके व एक हात नसलेले नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाल्यामुळे भयावह वास्तव समोर आले. नवजात अर्भक जीएमसीच्या पोलीस चौकीजवळ आढळले.या प्रकारामुळे जीएमसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा प्रकार नेमका कोणी का केला ? हे अद्याप अस्पष्ट असून एफआयआर दिलेला आहे. पोलीस तपासात ते समोर येईल. तूर्तास पोलीस तपास थंडबस्त्यात असल्याच चित्र दिसून येत आहे.

रुग्णालयाच्या पाठीमागे लागलेले मृत्यूचे शुक्लकाष्ठ नवे नाही. त्यात आता येथील रुग्ण पुन्हा अघटित घटनेच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या आधीही रुग्णांनी फाशी घेण्याच्या घटना, आत्महत्या करण्याच्या घटना, ठिकठिकाणी गुटखा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकून, ठिकठिकाणी खरकटे अन्न, पडलेले असून या सर्व प्रकारावरून रुग्णालय प्रशासन बेशिस्त असल्याचा घटना जाणवत आहेत. रुग्णालयातील मेस मध्ये सिलेंडर स्फोटच्या घटना, भ्रूण हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांनी सोमवारी १० मार्च 2025 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बचावात्मक भूमिका घेत माहिती दिली, तसेच जीएमसी प्रशासनाने सुद्धा रुग्णालय व महाविद्यालयाकडून बचावत्मक भूमिका घेत पत्रकार परिषदेत सांगितले की, हे अर्भक बाहेरील व्यक्तीने आणून टाकले असून, रुग्णालयाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. नियमानुसार, रुग्णालयात जन्मलेल्या बाळाच्या हातात ओळखपत्र आणि पायाला शाई असते, परंतु या अर्भकावर तसे कोणतेही चिन्ह नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

 (1)परंतु हा गैर प्रकार करताना या गैरकुत्यामध्ये रुग्णालय प्रशासनातील कर्मचारी शिकाऊ डॉक्टर. यांची साठ गाठ असेल तर ?जन्मलेल्या बाळाच्या पायाला शाई व हातात ओळखपत्र कसे सापडणार ? अशा चर्चांना नागरिकांमध्ये उधान आले आहे. अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्या म्हणण्यानुसार स्वयंघोषित रुग्णसेवकांना इशारा देण्यात आला आहे. रुग्णालयात काही व्यक्ती स्वतःला रुग्णसेवक सांगून रुग्णांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत जीएमसी प्रशासनाने अशा स्वयंघोषित रुग्णसेवकांना इशारा दिला आहे. रात्रीच्या वेळीही काही व्यक्ती रुग्णांशी संपर्क साधत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल,असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. (2) स्वयंघोषित रुग्णसेवकांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतरही त्यांच्यावर ठोस कार्यवाही का केली गेली नाही अद्याप पर्यंत ? तसेच रात्रीच्या वेळी काही व्यक्ती रुग्णांशी संपर्क साधत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही का केली गेली नाही आजपर्यंत ? इतकी सगळी माहिती असताना, इतके सगळे प्रकार घडत असतांना जीएमसीच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख गणेश अणे व त्यांची सुरक्षा करते तरी काय असा प्रश्न अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांनी त्यांना विचारावासा वाटला नाही का किंवा वाटत नाही का?

 द मिशन न्यूज 24 ने केलेल्या केलेल्या पाहणीत रुग्णांच्या सुरक्षेबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. एवढेच नाही तर रात्री दोन वाजल्यानंतर रुग्णालयातील अनेक वॉर्डांमध्ये तज्ञ डॉक्टर दिसले नाहीत, त्याचबरोबर काही शिकाऊ डॉक्टर टिंगल टवाळक्या करताना आढळले, तर काही शिकाऊ डॉक्टर मोबाईल व्हाट्सअप वरून गैरहजर असलेल्या तज्ञांचे सल्ले घेताना दिसले. काही शिकाऊ डॉक्टर मोबाईल चॅटींग करण्यामध्ये व्यस्त होते  त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेवर तसेच सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कारण, रुग्णालयात स्त्रीरोग वॉर्डपासून सर्जिकल वॉर्डपर्यंत सुरक्षा रक्षक दिसत नव्हते.काही कर्मचारी पडद्याआड झोपलेले दिसले, तर काही ठिकाणी कर्मचारीच उपस्थित नव्हते. आता प्रश्न असा पडतो की अशा परिस्थितीत कोणत्याही रुग्णाला अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असेल ? रात्रीच्या वेळी स्त्रीरोग वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षक तैनात न करणे हा रुग्णालय व्यवस्थापनाचा मोठा निष्काळजीपणा आहे.कारण, स्त्रीरोग वॉर्ड हा असा वॉर्ड आहे जिथे गरोदर महिला आणि त्यांच्या मुलांना दाखल केले जाते. व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे या प्रभागात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जीएमसी प्रशासन जबाबदार राहील. स्त्रीरोग वॉर्डामध्ये लहान मुलांचा समावेश असलेल्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यानंतरही व्यवस्थापनाने धडा घेतला नाही. स्त्रीरोग वॉर्डात रात्रीच्या वेळी बराच वेळ सुरक्षारक्षक नसल्याची परिस्थिती आहे.  रात्रीच्या वेळी जर तुमचा रुग्ण सर्जिकल वॉर्डमध्ये असेल आणि तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही कर्मचाऱ्यांची गरज असेल, तर रुग्णांच्या नातेवाईकांनी काय करावे ? त्याचवेळी रुग्णालयात रात्रीच्या वेळी नागरिकांना सुविधा मिळत नसल्यामुळे जीएमसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.


महाराष्ट्र, अकोला :  दिनांक :  17/3/2025
 












 

Post a Comment

Previous Post Next Post