THE MISSION NEWS 24

पोलीस हवालदार महेंद्र बहाद्दूरकर,यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती !


पोलीस हवालदार महेंद्र बहाद्दूरकर,यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती ! 

महेंद्र बहाद्दूरकर हे अतिशय खडतर प्रवास करून पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले आहेत..        

 

पोलिस हवालदार महेंद्र बहादूरकर यांच्या खांद्यावर सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे बोधचिन्ह लावताना पोलिस अधीक्षक बच्चन सिंह.

कोला : गेली अनेक वर्ष पोलीस सेवेत असलेले महेंद्र बहाद्दूरकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. महेंद्र बहाद्दूरकर हे अतिशय खडतर प्रवास करून पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले आहेत. 

महेंद्र बहाद्दूरकर यांनी अतिशय उत्तम पध्दतीने त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चोखरित्या आजपर्यंत पार पाडल्या आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत अकोला,पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महेंद्र बहाद्दूरकर यांना हवालदार पदावरून सदर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बढती देऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड केली.

पोलीस हवालदार महेंद्र बहाद्दूरकर,यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना प्रविण वगारे, बादलसिंग ठाकूर,राजू ठाकूर,बबलू मिश्रा,ॲड.श्रीकांत देशपांडे, नंदू मार्कंड, अविनाश वानखडे,राजू गवळी, जीवन गवळी, शिवा थेटे यांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.व त्यांचे अभिनंदन केले.


तसेच महेंद्र बहाद्दूरकर यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी 25 हवालदारांना सुद्धा मिळाली बढती. अकोला पोलिस दलातील २५ पोलिस हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदोन्नती झालेल्यांच्या खांद्यावर सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे बोधचिन्ह लावून सन्नत केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात कौटुंबिक कार्यक्रम घेऊन पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदोन्नती झालेल्या पोलिस हवालदार यांचा गौरव करून त्यांना पुढील प्रशासकीय सेवेसाठी मार्गदर्शन केले.तसेच त्यांच्या कुटुंबियांचाही सत्कार केला.पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार केलीआहे.

अकोला जिल्हा,पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा अति महत्वपूर्ण निर्णय.

दीपक रामदास गवई, राम सिताराम बुंदेले, चंदू महादेव, राखोंडे, विजय डिगांबर गिहे, अनंत वामनराव मुळे, अनिल सहदेव धनभर, सुनिल रामदास ताराम, किशोर गोपाळ चंदन, महेश माणिकराव वऱ्हाडे, वसंत काशीराम सोळंके, मनोज विक्रमजीत दुबे, सूरजकुमार भिकाजी चिंचोळकर, श्रीकृष्ण फुलचंद सोळंके, रविकुमार तुळशीराम गारवे, प्रमोद श्रीकृष्ण अटाळकर, राजेश देवराव पाटील, संजय उकर्डा करवते, राजेश विठ्ठलराव पिंजरकर, शाम गजानन पिंगळे, महेंद्र महादेवराव बहादूरकर, गणेश हरीश्चंद्र खटोड, राजू छोटू सूरतने, राजेश श्रीराम जाधव, सुंदरसिंग शेरबहादूरसिंग ठाकूर व अशोक मुरलीधार पाटील यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. जे कर्मचारी पदोन्नती नाकारणार आहेत त्यांना दोन वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी विचार करण्यात येणार नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्याने कायमस्वरुपी पदोन्नती नाकारली आहे त्यांचा पुढील कोणत्याही निवडसुचीकरीता विचार करण्यात येणार नाही. तसेच त्यांना पोलिस शिपाई पदावर पदावनत करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. 






Post a Comment

Previous Post Next Post