अकोला सिव्हिल सर्जन कार्यालयात निवृत्तांचा धुमाकूळ : डॉ. तरंगतुषार वारे यांच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह !
डॉ. तरंगतुषार वारे, तुमच्याच नाकाखाली ही अराजकता कधी थांबणार ?
अकोल्याच्या सिव्हिल सर्जन डॉ. तरंगतुषार वारे: 'टाइमपास'च्या अड्ड्यावर अंकुश कधी ?
महाराष्ट्र,अकोला : निवृत्तांचा कार्यालयात धुमाकूळ ! सिव्हिल सर्जन कार्यालयात अराजकता, कामाऐवजी 'टाइमपास'चा अड्डा !
सेवानिवृत्त 'दादां'ची मनमानी ! अकोला , सिव्हिल सर्जन कार्यालयात ढवळाढवळ, 'द मिशन न्यूज 24' लवकरच करणार चेहरा उघड !
नोकरशहांनो सावधान ! अकोला सिव्हिल सर्जन कार्यालयातील निवृत्तांचा उच्छाद, 'द मिशन न्यूज 24' चा 'अंतिम इशारा'!
महाराष्ट्र,अकोला : अकोला,आरोग्य उपसंचालक कार्यालयातील निवृत्तांचा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी कारभार ! कामाऐवजी 'टाइमपास'ला प्राधान्य ?
अकोला, महाराष्ट्र : अकोला जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) कार्यालयात आरोग्य उपसंचालक कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या काही व्यक्तींकडून सर्रासपणे सुरू असलेल्या मनमानी आणि नियमबाह्य कारभाराने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सेवानिवृत्त कर्मचारी कार्यालयात येऊन केवळ ढवळाढवळच करत नाहीत, तर शासनाच्या अधिकृत संगणकांचा वापर करून त्यांची खाजगी कामे, विशेषतः त्यांच्या स्वतःच्या खाजगी ड्राफ्टिंगसारखी कामे उरकून घेतात, असा आरोप कर्मचाऱ्यांकडूनच होत आहे. एवढेच नाही, तर अनेकदा ते केवळ वेळ घालवण्यासाठी (टाइमपास करण्यासाठी) कार्यालयात येऊन बसतात, ज्यामुळे कामाचे वातावरण बिघडते आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य उपसंचालक कार्यालयातून निवृत्त झालेले काही व्यक्ती नियमितपणे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात येतात. सेवानिवृत्त होऊनही ते आजही कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी असल्याच्या थाटात कर्मचाऱ्यांवर हुकूमशाही गाजवतात. त्यांची खाजगी कामे करण्यासाठी शासनाच्या मालमत्तेचा, म्हणजेच संगणकांचा गैरवापर ते करतात.
विशेष म्हणजे, या वरिष्ठ सेवानिवृत्त व्यक्तींकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांची वैयक्तिक कामे करून घेतली जातात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. कामासाठी नव्हे, तर अनावश्यक वास्तव्य करून कार्यालयात 'टाइमपास' करत असल्याचा सूरही कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे. यात आरोग्य उपसंचालक कार्यालयातून अधीक्षक पदावरून निवृत्त झालेले आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातून प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशनवर) आरोग्य उपसंचालक कार्यालयात अधीक्षक पदभार सांभाळून निवृत्त झालेले एक व्यक्ती देखील सामील आहेत. हे सेवानिवृत्त 'दादा' जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी करतात, कर्मचाऱ्यांना त्रास देतात, 'टाइमपास' करतात आणि स्वतःची ड्राफ्टिंगची कामे करून घेतात.
या गंभीर प्रकाराकडे जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) तरंगतुषार वारे (नागरगोजे) यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कार्यालयात वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या मनमानीमुळे कामकाजाचे पावित्र्य भंग पावत असून, शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सेवानिवृत्त व्यक्तींच्या मनमानीमुळे आणि अनावश्यक उपस्थितीमुळे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचा मानसिक त्रास वाढला असून, त्यांच्या कामावरही परिणाम होत आहे. शासनाच्या नियमानुसार, सेवानिवृत्त व्यक्तींना शासकीय कार्यालयात येऊन अशा प्रकारे हस्तक्षेप करण्याचा किंवा शासकीय संसाधनांचा गैरवापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. असे असतानाही हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरु असल्याने प्रशासकीय ढिलाई चव्हाट्यावर आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जर अशा प्रकारे नियमबाह्य हस्तक्षेप आणि 'टाइमपास' सुरू राहणार असेल, तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर होऊ शकतो. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन तरंगतुषार वारे,नागरगोजे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, या मनमानी कारभाराचे दुष्परिणाम भविष्यात निश्चितच दिसून येतील.
'द मिशन न्यूज 24' चा 'अंतिम इशारा'! हस्तक्षेप न थांबल्यास नावासह फोटोही प्रसिद्ध करणार !
'द मिशन न्यूज 24' या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. ज्या सेवानिवृत्त व्यक्तींकडून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात हा त्रासदायक मनमानी कारभार सुरू आहे, त्यांनी हा इशारा गंभीरपणे घ्यावा. जर त्यांचा हा हस्तक्षेप आणि गैरव्यवहार थांबला नाही, तर पुढील बातमीत 'द मिशन न्यूज 24' संबंधित व्यक्तींचे फोटो आणि त्यांची नावे उघड करणार आहे. यात आरोग्य उपसंचालक कार्यालयातून अधीक्षक पदावरून निवृत्त झालेले आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातून प्रतिनियुक्तीवर आरोग्य उपसंचालक कार्यालयात अधीक्षक पदभार सांभाळून निवृत्त झालेले, जे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी करतात, कर्मचाऱ्यांना त्रास देतात, 'टाइमपास' करतात आणि स्वतःची कामे करून घेतात, यांचा देखील समावेश असेल. यांचा मनमानी कारभार नाही थांबला, तर यांचा सुद्धा फोटो व नाव उघडकीस करण्यात येईल. या इशाऱ्यानंतर तरी या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. शासकीय कार्यालयाचे पावित्र्य भंग करणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या या प्रवृत्तीला आम्ही कदापि खपवून घेणार नाही ! 





