THE MISSION NEWS 24

महाराष्ट्र,अकोला:- अकोला जिल्हा परिषदेत खळबळ! मानधनासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांशी सीईओंची अरेरावी; 'साठगाठ' आणि 'फूट पाडो' नीतीचा गंभीर आरोप ! कर्मचाऱ्यांविरुद्ध सीईओ भडकले, डीएचओंची फूस ? जिल्हा आरोग्य विभागात खळबळ !

 महाराष्ट्र,अकोला:- अकोला जिल्हा परिषदेत खळबळ! मानधनासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांशी सीईओंची अरेरावी; 'साठगाठ' आणि 'फूट पाडो' नीतीचा गंभीर आरोप!

 *अकोला आरोग्य विभाग धगधगतोय ! सीईओंच्या दडपशाहीपुढे कर्मचाऱ्यांचा निर्धार; कोरोना काळातील सेवेचा प्रशासनाला विसर! 

* कर्मचाऱ्यांविरुद्ध सीईओ भडकले, डीएचओंची फूस? जिल्हा आरोग्य विभागात खळबळ!

* अकोला आरोग्य विभागात वाद! सीईओंच्या अरेरावीला डीएचओ जबाबदार ? 

 * डीएचओंच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले! प्रशासनाची डोकेदुखी वाढली

महाराष्ट्र,अकोला, दि. 7 मे 2025 : अकोला जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे ६०० कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या आंदोलनाने आता स्फोटक वळण घेतले आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मानधनासाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांशी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी केलेल्या कथित अरेरावीमुळे वातावरण अधिकच तापले आहे. सीईओंच्या या अभद्र वर्तनाने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि प्रशासनाविरोधात उग्र असंतोष निर्माण झाला आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा शेकडो आरोग्य कर्मचारी आपल्या व्यथा मांडण्यासाठी सीईओंच्या कार्यालयाबाहेर एकत्र आले, तेव्हा सीईओ महोदयांनी त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे संवाद साधला. "इतके सगळे कशाला आले आहात? बाहेर व्हा आणि फक्त दोनच जण आत या," अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांचा घोर अपमान केला, असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संतप्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सीईओंच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये गंभीर संशयाचे वातावरण पसरले आहे. काही कर्मचाऱ्यांनी थेट आरोप केला आहे की, केवळ दोघांना आत बोलावून सीईओ त्यांच्याशी वेगळी 'साठगाठ' करण्याचा प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून त्यांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे.

या संदर्भात एका आंदोलक कर्मचाऱ्याने सांगितले, "आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्या समस्याही सारख्याच आहेत. सीईओंचे हे वागणे अत्यंत अन्यायकारक आणि आमच्यात भेद निर्माण करणारे आहे. त्यांनी आमच्या भावनांचा आणि एकतेचा अपमान केला आहे."

यापूर्वी सादर केलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गंभीर आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील हे कंत्राटी कर्मचारी आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत अकोला जिल्ह्याने मागील १२ महिन्यांत ८ महिने आरोग्य सेवांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. असे असूनही, या कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगाराकडे प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.

मा. सहसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या स्पष्ट आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन दर महिन्याच्या १ तारखेला  होणे बंधनकारक आहे. परंतु, फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. वेळेवर पगार न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि बँकेचे हप्ते भरणेही त्यांना आता कठीण झाले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, अकोला परिमंडळातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ५ टक्के वार्षिक मानधनवाढीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, केवळ अकोला जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना या न्याय लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबत यापूर्वी अनेकवेळा प्रशासनाला विनंती करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी/कर्मचारी संघटनेने प्रशासनाला तातडीने मागील दोन महिन्यांचे वेतन आणि ५ टक्के वार्षिक मानधनवाढीची थकबाकी देण्याची जोरदार मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

आता जिल्हा परिषद प्रशासन आणि पालकमंत्री या गंभीर प्रकरणावर काय भूमिका घेतात आणि कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर राखत त्यांना न्याय कधी मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. सीईओंच्या या कथित अरेरावीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणखी उद्रेक होण्याची शक्यता असून, याचा जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर गंभीर आणि नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही परिस्थिती पाहता, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा आरोग्य यंत्रणेत मोठे संकट उभे राहू शकते.

* कर्मचाऱ्यांविरुद्ध सीईओ भडकले, डीएचओंची फूस? जिल्हा आरोग्य विभागात खळबळ!

मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी म्हटले की "आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्या समस्याही सारख्याच आहेत. सीईओंचे हे वागणे अत्यंत अन्यायकारक आणि आमच्यात भेद निर्माण करणारे आहे. त्यातच डीएचओ यांनी त्यांना भडकवल्याची माहिती मिळत आहे, हे अधिक गंभीर आहे. या दोघांनी मिळून आमच्या भावनांचा आणि एकतेचा अपमान केला आहे."

ज्यांनी कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा केली, त्यांच्या भावनांचा आणि एकतेचा हा घोर अपमान आहे."सीईओंच्या या घृणास्पद वर्तनाने कोविड योद्ध्यांमध्ये तीव्र आक्रोश आणि प्रशासनाविरोधात धगधगता असंतोष उफाळून आला आहे.

कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी लाववली होती जिवाची बाजी!

ज्यावेळी संपूर्ण जग कोरोनाच्या भयंकर संकटाने त्रस्त होते, त्यावेळी याच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता फ्रंटलाईनवर लढाई लढली होती. दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लसीकरण मोहीम यशस्वी करणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलल्या होत्या. अनेक कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब आणि मुलाबाळे सोडून रुग्णांची सेवा केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच अकोला जिल्हा कोरोना संकटावर प्रभावीपणे मात करू शकला. आज त्यांच्या याच योगदानाचा आणि त्यागाचा प्रशासनाला पूर्णपणे विसर पडलेला दिसतो आहे, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे.

निवेदन सादर करतेवेळी मार्गदर्शक पवन वासनिक (मुख्य समन्वयक), रुपाली ठक्कर (समन्वयक), जिल्हा समन्वयक श्री. गोपाल अंभोरे, उपसंयोजक डॉ. जाकिर अहेमद, जिल्हा समन्वयक डॉ. रामु नागे, सहसमन्वयक सचिन उनवणे, उपसमन्वयक डॉ. अनुप्रताप जयराज, उपसमन्वयक भावना गवई, डॉ. वैशाली तळे, डॉ. प्रीती कोगदे, ऍड. शुभांगी खांडे, विजया वानखडे, वैशाली राठोड, मंगला डोंगरे (प्रसिद्धी समन्वयक), अंकुश गंगाखेडकर, संदीप घाटोळ, गणेश शर्मा (तालुका समन्वयक), सहसमन्वयक मनोज कडू, सहसमन्वयक इम्रान खान, उपसंयोजक महेंद्र कोलटक्के, अनुराधा शिरसाट (सहसमन्वयक), डॉ. मनीष ठाकरे (उपसमन्वयक), उमेश ताठे, डॉ. अनिल कापसे, डॉ. निशांत प्रधान, प्रशांत काळे, डॉ. चेतन टिकार, राहुल भिरड, डॉ. नितीन जानोरकर, डॉ. मनीष मेन, डॉ. पंकज इंगोले, डॉ. राहुल सदाफळे, रमण लोखंडे, डॉ. अत्ताउर रहेमान, डॉ. जुगलकिशोर चितलांगे, डॉ. अश्विन तिवारी, कपिल शिरसाट, डॉ. सिद्धेश सावंत, कृष्णा बारस्कर, किशोर फाळके, सुदाम भिंगारे, निलेश भिरड, राम पाटील यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व तांत्रिक व अतांत्रिक पदांवर कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 * अकोल्यातील आरोग्य योद्ध्यांचा आक्रोश! मानधनासाठी एल्गार; सीईओंची संवेदनहीन वागणूक!

* कोरोना योद्ध्यांचा अपमान! अकोला जिल्हा परिषदेत मानधनासाठी आंदोलन; सीईओंच्या अरेरावीने वातावरण तापले!

* मानधन थकले, मानवता हरली! अकोल्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा उद्रेक; सीईओंच्या 'फूट पाडो' नीतीचा निषेध!

अकोला जिल्हा परिषदेत मानधनासाठी कर्मचाऱ्यांचा आक्रोश! सीईओंची अरेरावी, 'साठगाठ' आणि 'फूट पाडो' नीतीचा गंभीर आरोप; डीएचओंच्या भूमिकेवर संशय!


‼️दिनांक :-10/5/2025 ‼️


Post a Comment

Previous Post Next Post